आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता नव्हे, मलाही लढाऊ शेतकरी व्हायचंय; खासदार राजू शेट्टी यांचा मुलगा साैरभचा निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता व्हायचं माझं लहानपणी स्वप्नं हाेतं. मोठा झालो तसं कळलं खरे हीरो तर पप्पाच आहेत. मग मी अॅग्रीला प्रवेश घेऊन चांगला शेतकरी व्हायचं ठरवलं. कृषी पदवीधर झाल्यावर आजन्म शेतकरी संघटनेचा पाईक म्हणून काम करायचा निर्णय घेतलाय, असे मनोगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ याने ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केले.    
 
पप्पांना कार्यकर्ते ‘साहेब’ म्हणतात, त्यामुळे मी पण साहेब म्हणू लागलो. अाजवर पप्पांचा सहवास असा कधी लाभलाच नाही. ते घरी कधीच नसतात, कायम फिरत असतात. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण जयसिंगपूरला चुलत्याकडे झालं. १ मे रोजी माझा १९ वा वाढदिवस झाला. एकमेव त्या वाढदिवसाला पप्पा घरी होते, असं सौरभ म्हणाला. वडिलांच्या या पूर्वीच्या आंदोलनात सहभागी होतास का, यावर सौरभ म्हणाला, पप्पांच्या अनेक आंदोलनात मी सहभागी झालोय.  पण शेवटी आंदोलन हिंसक व्हायचे. गाेळीबार कधी होईल याचा नेम नसायचा. परस्थिती चिघळली की मग मला घरी पाठवलं जायचं. पुणे ते मुंबई या आत्मक्लेश यात्रेत मात्र मी पहिल्यांदाच पूर्णपणे सहभाग नोंदवतोय. त्याचा मला आनंद आहे.   
लोक पप्पांचे पाय धुतात, त्यांच्या पाया पडतात, अंग दाबतात.. हे पाहून मला भरून येतं. पप्पाइतकं अापणसुद्धा कार्यकर्त्यांचं प्रेम मिळवायचं, त्यासाठी शिक्षण पूर्ण झालं की संघटनेत झोकून देऊन काम करायचं असं मी ठरवलंय. मला आमदार, खासदार होण्यात रस नाही. पण शेतकरी संघटनेचं काम मात्र मी नेटानं करणार, असा निर्धार सौरभनं व्यक्त केला. पुणे ते मुंबई असं १४० किमी पायी चालत येताना काय वाटलं.. असं विचारताच तो म्हणाला, शेतकऱ्यांना शेती करायला किती कष्ट पडतात, याचा उलगडा मला या सात दिवसांत झाला. पप्पांना कार्यकर्त्यांकडून मिळणारं प्रेम पाहून तर मी धन्य झालो. शेतकरी संघटनेच्या आगळ्या रूपाचं 
दर्शन झालं, असे ताे म्हणाला. 
 
राजू शेट्टींसारखं मलाही जगायचंय
अामच्या घरी आजी रत्नमाला आणि आई संगीता दोघी असतात. आमचं कुटुंब शेतकरी. वडिलोपार्जित पाच एकर शेती. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. नाव माझं सौरभ असलं तरी पप्पा मला लाडानं ‘गण्या’ म्हणतात. त्यांनी लाडानं मारलेली हाक पुन:पुन्हा ऐकू यावी असं मला वाटतं. पण त्यांना सवड नसल्यानं ही हाक मला दोन-दोन महिने ऐकायला मिळत नाही, अशी खंत सौरभने व्यक्त केली.  माझे मित्र एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणारे आहेत. मी मात्र शेती करण्याचा निर्णय पक्का केलाय. कारण मला राजू शेट्टी या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे जगायचं आहे, असे सौरभ शेट्टी याने आत्मविश्वासाने सांगितले.
 
पुढील स्लाइडवर वाचा, रक्त सांडू पण समृद्धी महामार्ग अडवू : राजू शेट्टी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...