आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raju Shetty Talked With Udhav Thakare, Vinod Tawade

उद्धव ठाकरे, विनोद तावडेंशी खासदार राजू शेट्टींची चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख व खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन चर्चा केली. या वेळी आमदार सुभाष देसाई यांचीही उपस्थिती होती. भाजप नेते विनोद तावडे त्यांनी भेट घेतली.


राज्यातील आघाडी सरकारविरोधी लढा देण्यासाठी मनसेला महायुतीत आणण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत आलेले रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले आता खासदारकी मिळत नसल्याने नाराज आहेत. प्रसंगी महायुतीतून बाहेर पडण्याचे इशारेही ते देत आहेत. त्यामुळे युतीचे नेते इतर छोट्या पक्षातील नेत्यांना जवळ करून कॉँग्रेस- राष्‍ट्रवादीची सत्ता उलथवून टाकण्याचे मनसुबे रचत आहेत.
शेट्टी यांनी साखर सम्राटांविरोधात जोरदार मोहीम उघडलेली आहे. कॉँग्रेस- राष्‍ट्रवादीचेच मंत्री, नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे शेट्टींना महायुतीत घेण्याचा युतीचा प्रयत्न आहे. त्याला शेट्टींकडूनही प्रतिसाद मिळत आहे. महायुतीत जागावाटपाची चर्चा लवकरच अपेक्षित आहे. त्यात शेट्टींच्या पक्षालाही काही जागा देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.