आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानीही सरकारमधून बाहेर पडणार?, खोत यांनाच महत्त्व देत असल्‍याने राजू शेट्टी नाराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सदाभाऊ खोत यांनाच अधिक महत्त्व देत असल्याचे पाहून स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी सध्या प्रचंड नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच सदाभाऊ यांच्या मुलाला यंदाच्या निवडणुकीत तिकीट देण्यात आल्याने खोत यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत संघटनेने सांगितल्यास सदाभाऊंना सरकारमधून बाहेर पडावे लागेल, असा इशारा सोमवारी त्यांनी दिला. यावरून खोत आणि राजू शेट्टी यांच्यात आता सत्तेवरून वाद निर्माण होत असल्याचेच चित्र दिसून येत आहे.

शिवसेना सत्तेबाहेर पडल्यास स्वाभिमानी पक्षही सत्तेतून बाहेर पडेल, असे वक्तव्य शेट्टी यांनी नुकतेच केले आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मुख्यमंत्री जास्तच महत्त्व देत असल्याने स्वाभिमानी संघटनेत उभी फूट पाडण्याचा हा प्रयत्न असावा, अशी शंका शेट्टी यांना आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला असावा, असे मानले जात आहे. एकीकडे सदाभाऊंचे सरकारमधील वजन वाढत चालले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले तर सदाभाऊ यांना सरकारमधून बाहेर पडावेच लागेल, असा इशारा देत खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या आगामी रणनीतीची झलकही दाखवली.

प्रचारासाठी जाणार नाही: सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर याने वाळवा तालुक्यातील बागणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक अर्ज भरला. यावर शेट्टी यांनी खोत यांच्यावर थेट घराणेशाहीची टीका केली. गेल्या आठवड्यात त्यांनी संघटनेच्या नेत्यांनी घरच्यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका स्पष्ट केली होती. एवढे स्पष्ट धोरण जाहीर करूनही सदाभाऊंनी आपल्या मुलाला तिकीट देऊन पक्षात घराणेशाही आणली, असा आरोपही शेट्टींनी केला.
 
मी सदाभाऊंच्या मुलाच्या प्रचारासाठी जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत खोत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘सुनांना अपघात झाला असून मी तेथे आहे. याबाबत मी नंतर सविस्तर बोलेन,’ असे सांगितले. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ‘स्वाभिमानात’ वादाची कारणे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...