आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raju Shetty With Bjp, Ramdas Athavale Still In Confusion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजू शेट्टी भाजपसोबतच, \'स्वाभिमानी\'ला 18 जागा; आठवले द्विधा मन:स्थितीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय जनता पक्षाच्या नव्या महायुतीसोबत जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी घेतला आहे. भाजपने शेट्टी यांच्या पक्षाला 18 जागा देण्याची तयारी दाखवली आहे. यात कोल्हापूर व सोलापूर पट्ट्यातील 7-8 जागांचा समावेश आहे. महादेव जानकर यांचा रासप आणि विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्षाने गुरुवारीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडल्यानंतर भाजपने वेगळीच रणनिती आखली. त्यानुसार घटकपक्षांना वेगवेगळी आश्वासने देत आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळविले. राजू शेट्टींना मनासारख्या जागा देत केंद्रात भविष्यात एखाद्या चांगल्या जागी वर्णी लावण्याचे आश्वासन दिल्याचे कळते. त्यामुळे राजू शेट्टींनी या प्रस्तावाला लागलीच होकार दिल्याचे कळते. याचबरोबर स्वाभिमानीला कोल्हापूर पट्ट्यातील चार प्रमुख जागा दिल्या आहेत. शाहूवाडी, चंदगड, राधानगरी व वाळवा-इस्लामपूर आदी स्वाभिमानीची ताकद असलेल्या पट्ट्यातील जागा भाजपने सोडल्या आहेत. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, पंढरपूर या जागा आपल्याला सोडाव्यात अशी मागणी केली आहे. येथेही स्वाभिमानीच्या गळाला चांगले उमेदवार लागले आहेत. याशिवाय इतर आणखी काही जागांवर चर्चा सुरू आहे. भाजप स्वाभिमानीला एकून 18 जागा सोडणार आहे.
आठवलेंचे काय?- महायुतीतील घटकपक्ष असलेल्या आरपीआयच्या रामदास आठवलेंना भाजपच्या नव्या महायुतीत आणण्याचा भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. रामदास आठवलेंना केंद्रात मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, राजीवप्रताप रूडी, ओमप्रकाश माथूर आदी नेत्यांनी आठवलेंना शब्द दिला. काल रात्री ही बैठक झाली. याचबरोबर शहांबरोबर बोलणेही करून दिले. त्यानंतर आठवलेंनी माझ्या पक्षाशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतो. माझ्यासह कार्यकर्त्यांचे व पक्षाचे कशात हित आहे हे पाहूनच आम्ही निर्णय घेऊ व तुम्हाळा कळवू असे आठवलेंनी भाजप नेत्यांना सांगितले. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी आठवलेंना शिवसेनेसोबत राहण्याची विनंती केली आहे. तुम्ही माझ्यासोबत राहा, तुम्हाला आश्वासन नाही देणार नाही. पण जे काही भविष्यात मला मिळेल ते तुमचेच असेल. हक्काने काय असेल ते मांगा असा शब्द उद्धव यांनी आठवलेंना दिला आहे. त्यामुळे आठवले द्विधा मनस्थितीत आहेत. याचबरोबर आठवलेंची उद्धव व शिवसेनेशी भावनिक नाते झाले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आठवलेंना मातोश्रीवर बोलून शिवशक्ती-भीमशक्ती काहीही करू शकते असा सांगत सेनेसोबत येण्यास सांगितले होते. त्यानुसार आठवले महायुतीत आले होते. त्यामुळे आठवले गुरुवारी दुपारपर्यंत कोणताही निर्णय घेऊ शकले नाहीत. मात्र, आठवले सत्तेसाठी ऐनवेळी भाजपसोबतच्या नव्या महायुतीत जातील असे बोलले जात आहे.