आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा निवडणूक: आठवलेंकडे दहा कोटींची संपत्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, त्यांच्या पत्नी सीमा, आई हौसाबाई आणि मुलगा जीत या चौघांच्या नावावर सुमारे 9 कोटी 88 लक्ष रुपये इतकी स्थावर जंगम मालमत्ता आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करताना आठवले यांनीच ही माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे.
आठवले यांची बचत खाती, मुदत ठेवी तसेच पीपीएफमध्ये 19.40 लाख गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे 2 लाखांचे सोने असून 42 हजारांची रोख आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात 12 एकर जमीन, गुरगाव येथील सदनिकेसह एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता 1 कोटी 47 लाखांच्या घरात जाते. गृहिणी असलेल्या सीमा यांच्याकडे 6 लाख 57 हजार किमतीचे दागिने आहेत. विमा पॉलिसी, विविध बँक खाती आणि मुदत ठेवींमध्ये 11.82 लाखांची गुंतवणूक आहे. दहिसर येथील व्यापारी गाळा, दिल्ली येथील एक सदनिका, चारकोप येथील प्लॉट आणि वांद्रे येथील बंगला अशी 2.41 कोटींची स्थावर मालमत्ता सीमा यांच्या नावे आहे. त्यांच्यावर 21.40 लाखांचे कर्जही आहे.
आई हौसाबाई यांच्याकडे 1.16 लाखांचे दागिने, सांगलीत एक गुंठा जमीन, मालाड येथे सदनिका अशी 54 लाखांची मालमत्ता आहे. मुलगा जीत याच्या नावे सोने, विमा आणि बॅँक खात्यात एकूण 13 लाखांची मालमत्ता आहे.
रामदास आठवले यांचे सिद्धार्थ महाविद्यालयात इंटर आर्टपर्यंत शिक्षण झालेले असून त्यांच्यावर विविध न्यायालयांत 6 दखलपात्र, तर 2 अदखलपात्र दावे अद्यापही प्रलंबित आहेत.