आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajyasabha Election Ncp May Send Muslim Candiate

राज्यसभेसाठी \'राष्ट्रवादी\'चा मुस्लिम चेहरा, नवाब मलिक-माजिद मेमनमध्ये चुरस?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुढील महिन्यात होत असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी एका जागेवर पक्षाध्यक्ष शरद पवार तर दुस-या जागेवर एका मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी देणार आहे. यासाठी प्रसिद्ध वकिल व कायदेतज्ञ माजिद मेमन किंवा आमदार नवाब मलिक यांना दिल्लीत पाठविण्याचा विचार सुरू आहे.
निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात रिक्त होणा-या राज्यसभेतील 55 जागांसाठी सात फेब्रुवारीला निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील दोन जागा रिक्त होत आहेत. वाय. पी. त्रिवेदी आणि जनार्दन वाघमारे यांचा कार्यकाळ येत्या 2 एप्रिलला संपत आहे. त्यातील एका जागेवर पक्षाध्यक्ष शरद पवार अर्ज दाखल करणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
दुस-या जागेबाबतचा निर्णय दोन-तीन दिवसांत होईल असे सांगण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादीतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुस-या जागेवर मुस्लिम चेह-याला संधी देण्याचा निर्णय पवारांनी घेतला असल्याचे कळते. त्यासाठी पक्ष माजिद मेमन किंवा नवाब मलिक या चेह-यांचा विचार करीत आहे.
मुस्लिम समाजाला संधी देण्याबाबत सांगितले जात आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आपल्या 22 जागांवर एकाही मुस्लिम चेह-याला संधी देणार नाही. त्यामुळे मुस्लिम व्होट बॅक पक्की करण्यासाठी त्यापूर्वीच महाराष्ट्रातून संसदेत मुस्लिम चेहरा पाठवावा असे गणित पवारांनी मांडले आहे.
पुढे वाचा, फौजिय खान यांच्या नावाचाही झाला होता विचार...