आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rakhi Sawant And RPI \'s Mahila Wing Department Met Chief Minister Prithviraj Chavan

PHOTOS: मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राखी सावंतने वाचला मुंबईतील समस्यांचा पाढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री राखी सावंत राजकारणात सक्रिय झाली आहे. पक्षाचे नेते आणि अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्यासह राखीने मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन अनेक प्रश्नांची जंत्री मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी रिपाईच्या शिष्टमंडळाला या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
लोकसभा निवडणुकीआधी 'मै भाजप की बेटी' म्हणणार्‍या राखी सावंतला भारतीय जनता पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर तिने स्वतःचा पक्ष स्थापन करुन निवडणूक लढवली मात्र, तिला अनामत रक्कमही वाचवता आली नाही. काही दिवसांपूर्वीच राखीने भाजप, शिवसेनेचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मध्ये प्रवेश केला आहे.
पक्षाध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पक्षात नवख्या असलेल्या राखीला रिपाई महिला आघाडीचे अध्यक्षपद बहाल केले. त्यानंतर ती पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहात आहे. खासदार आठवले यांच्या नेतृत्वात रिपाईच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेतील. यावेळी सर्वांच्या नजरा या राखी सावंतवरच खिळलेल्या होत्या. तिनेही कसलेल्या राजकारण्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांसमोर अनेक प्रश्नांची यादी वाचली. त्यात प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न होता.
राखी म्हणाली, पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला असला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे मुंबईतील झोपडपट्टी भागातील पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. यामुळे महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 30 रुपयांमध्ये मिळणारी पाण्याची गॅलन तब्बल 100 रुपयांना विकली जात आहे. गरीब आणि दलित कुटुंबांना एवढे महाग पाणी विकत घेणे शक्य होत नाही. त्यातच मुंबईत टँकर माफिया फोफावले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.'
मुंबईतील शाळांच्या प्रश्नांसंबंधी राखी म्हणाली, 'शाळांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे मुले आजारी पडत आहेत. शाळांमध्ये मुलांना बसण्यास बाके नाहीत, वर्गात पंखे नाहीत. यामुळे ते शिक्षणावर लक्ष्य केंद्रीत करु शकत नाही. त्यांना गर्मीचा अतिशय त्रास होतो.'
राखीने मुख्यमंत्र्यांचे महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधथ विनंती केली, की कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या तरुणींना संरक्षण देण्याची गरज आहे. त्यांचा कामाच्या ठिकाणी आणि बाहेर देखील वारंवार लैंगिक छळ होतो. मात्र, समाजात बदनामी आणि त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे त्या याबाबत तक्रार करत नाहीत. त्यांच्या सुरक्षिततेकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेबद्दल राखीने मुख्यमंत्र्यांना सांगितले. गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये अनेक गोष्टींची कमतरता आहे. तिथे अत्याधुनिक सेवा-सुविधा नाहीत. त्या तत्काळ पुरवल्या पाहिजे, असे राखी म्हणाली.
छायाचित्र - खासदार रामदास आठवले, राखी सावंत आणि अविनाश महातेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री चव्हाण यांना मागण्यांचे निवदेन दिले.