आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लिओनीचा आदर्श घ्या, म्हणणार्‍या \'रामू\'ला जितेंद्र आव्हाडांचा सवाल; तुला आई नाही का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जागतिक महिला दिनी ‘सनी लिओनी जितका आनंद देते, तितकाच आनंद जगभरातील सर्व महिलांनी पुरुषांना द्यावा', असे ट्‍वीट करणार्‍या दिग्दर्शक राम गोपाल वर्मा नवा वाद ओढवून घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यात उडी घेतली आहे. दोघांमध्ये ट्विटरयुद्ध सुरु झशले आहे. वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या वर्मांना माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा सज्जड इशारा दिला आहे.

आव्हाड यांनी वर्मा यांच्या ट्‍वीटवर आक्षेप नोंदवला आहे. तुम्हाला आई नाही का? असा सवाल करत कायदा हातात घेण्याचीही आमची तयारी आहे, असाही इशारा आव्हाड यांनी दिला आहे. त्यावर आता रामगोपाल वर्मा यांनी "आव्हाड यांच्यासारखा विदुषक दुसऱ्यांनी काय बोलायचे हे ठरवणार का?', असे ट्‍वीट केले आहे. यावरून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राम गोपाल वर्मांच्या वादग्रस्त ट्वीटची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याने अनेकदा  ट्वीट केले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अभिनेता टायगर श्रॉफबद्दल वादग्रस्त ट्वीट केले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... काय आहे राम गोपाल वर्मांचे सनी लिओनीवरून ट्‍वीट...?

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...