आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकांना राम नाईकांचा राम राम, लोकसभेसाठी उभे राहणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘गेल्या 35 वर्षांत मी दहा निवडणुका लढवल्या. यापुढे लोकसभेची निवडणूक कदापि लढवणार नाही. मात्र, आपल्या अनुभवांचा फायदा पक्षाला करून देण्यासाठी पक्षकार्यात सक्रिय राहणार आहे,’ अशी माहिती भाजप नेते व माजी पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनी बुधवारी दिली.


मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 1978 मध्ये बोरिवली मतदारसंघातून नाईक पहिल्यांदा आमदार झाले. तीन वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1989 मध्ये खासदार झाले. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून नाईक यांना सलग पाच वेळा मतदारांनी निवडून दिले. पुढे दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. 1998 च्या वाजपेयी मंत्रिमंडळात नाईक यांनी रेल्वे आणि पेट्रोलियम मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. ते सध्या 80 वर्षांचे असून 1994 मध्ये कर्करोगाच्या आजारावर त्यांनी मात केली होती.
मुंबईत सलग पाचवेळा निवडून येण्याचा आणि विक्रमी मतांनी निवडून येण्याचा असे दोन विक्रम नाईक यांच्या नावावर आहेत. लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा नाईक यांनी केली असली तरी, राज्यसभेबाबत मात्र त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही.