Home »Maharashtra »Mumbai» Ram Rahim Honeypreet Flats In Mumbai Near Dileep Kumar Sanjay Dutt

सैफ, दिलीप कुमार जवळ घेतले आहेत राम रहीमने फ्लॅट, हनीप्रीतला घेऊन जात होता या ठिकाणी

दिव्य मराठी वेब टीम | Sep 11, 2017, 18:41 PM IST

  • हनीप्रीत आणि बाबा राम रहीम आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी मुंबईला ये-जा करत होते.
मुंबई-साध्वी बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेल्या रामरहीमने मुंबईतही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जमा केली असल्याचे समोर आले आहे. त्याने वांद्रे येथील टर्नर रोड जंक्शनवर प्लॅटिनम नावाच्या इमारतीत बिल्डिंगमध्ये 3 मजले भाड्याने घेतले होते. सैफ अली खान आणि संजय दत्त समवेत अनेक दिग्गज कलाकार या इमारतीच्या आसपास राहतात.

हनीप्रीतला नेत होता या ठिकाणी
- मुंबईतील अतिशय महागड्या इमारतींमध्ये प्लॅटिनमचा समावेश होतो. त्याच्या जवळच सैफ अली खानचे घर आहे. तेथून 500 मीटर अंतरावर दिलीप कुमार आणि संजय दत्त यांचे घर आहे.
- या व्यतिरिक्त या भागात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, अभिनेता सलमान खान, शाहरुख खान हे राहतात.
- राम रहीमने प्लॅटिनम इमारतीमधील फ्लॅट नं. 202, 1102 आणि 1202 हे फ्लॅट भाड्याने घेतले आहेत.
- तेथील चौकीदाराने सांगितले की, राम रहीम येथे नियमित येत होता.

हनीप्रीतसाठी दुसरी जागा
- दुसरीक़डे राम रहीम आणि हनीप्रीतने मुंबईतील जुहू बीचजवळ सी-फेसिंग इमारतीत डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतले होते.
- रिवेरा को-ऑपरेटिव्ह सोसायटीत हनीप्रीतचे भाड्याचे फ्लॅटस योगेश राधाकृष्ण नावाच्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर्ड आहेत.
- चौकीदाराने सांगितले की राम रहीम आणि हनीप्रीत या ठिकाणी वर्षातून एकदा अथवा दोनदा येत. मे महिन्यात ते याठिकाणी आले होते.

सोसायटीत लोक होत राम रहीममुळे त्रस्त
- राम रहीमच्या कार आणि त्यांच्या अंधश्रध्दाळू भक्तांमुळे सोसायटीतील नागरिक त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी एक नोटीस राम रहीमला बजावली होती.
- प्लॅटिनिम बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, राम रहीम फ्लॅटमध्ये हरियाणातील एक नोकर ठेवला होता. तो त्याला 35 हजार रुपये पगार देत होता.
- राम रहीम मुंबई येणार असल्याचे समजल्यावर तो तेथील त्याची चोख व्यवस्था ठेवत असे.
- येथे 2 लक्झरी कार असून त्या बाबा राम रहीम आणि हनीप्रीत वापरत होते.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended