आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Shinde Get Cabinet Ministry In Cabinet Extension ?

मंत्रिमंडळ विस्तारात राम शिंदेंना बढती, महादेव जानकरांचा पत्ता पवारांमुळे कट?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना लगेचच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीनंतर करण्यासही पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाला आहे. या विस्तारात दहा मंत्र्यांचा शपथविधी होणार असून त्यात भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन व घटक पक्षांचे तीन मंत्री असतील. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. तर मंत्रिपदाची आशा लावून बसलेले ‘रासप’चे महादेव जानकर यांचा मात्र पत्ता कट होण्याची चिन्हे आहेत. त्यांच्याऐवजी राहुल कुल यांना लाल दिवा मिळू शकतो, तर स्वाभिमानी संघटनेचे सदाभाऊ खोत, तर रिपाइंच्या अविनाश महातेकर यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला निवडणुकांमध्ये मोठी ताकद दिली होती. मुंडे यांच्या पश्चात त्यांच्या कन्या पंकजा यांनीही जानकरांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी वजन खर्ची घातले. पण त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. जानकर यांचा पत्ता कट करण्यामागे शरद पवार असल्याचे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीत जानकरांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढत दिली. त्यावेळी जानकर यांनी पवार तसेच राष्ट्रवादीवर झोंबरी टीका केली होती. त्यामुळे दुखावलेल्या पवारांनीच जानकरांचा पत्ता कट करण्यासाठी मोदींकडे शब्द टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. जानकर मंत्री झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजातील ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहील, व राष्ट्रवादीसाठी ते डोकेदुखी ठरू शकतात, हा धोकाही पवारांना वाटतो.

पुढे वाचा.. भाजपचे संभाव्य मंत्री