आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramabai Ambedkar's First Memorial Come Into Kokan

रमाबाई आंबेडकरांचे पहिले स्मारक कोकणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल मोठा गौरव झाला. स्मारके बांधली, भीमाच्या या लढाईत साथ देणारी त्यांची अर्धांगिनी मात्र उपेक्षितच राहिली होती. भारतीय बौद्ध महासभेने ही उपेक्षा संपवली असून रमाबाईंच्या जन्मगावी स्मारक उभारले आहे. बाबासाहेबांच्या पत्नीचे देशातील हे पहिलेवहिले स्मारक ठरले आहे.

रमाबाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातला. दापोली तालुक्यातील वणंद गावच्या भ‍िकू धुत्रे यांची ही कन्या. त्यामुळे त्याच मूळ जन्मगावी स्मारक बांधण्याचा संकल्प भारतीय बौद्ध महासभेने सोडला होता. २००४ मध्ये पायाभरणी करण्यात आली. वर्गणीतून स्मारकाचे काम चालू झाले. दोनमजली स्मारकास ३० लाखांचा खर्च आला. सरकारकडून एकही पैसा घेतला नाही, अशी माहिती स्मारकाचे संचालक एस. के. भंडारे यांनी दिली. बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव त्यांच्या पत्नी मीराताई. बौद्ध महासभेचे काम त्याच पाहतात. मीराताईंच्या मार्गदर्शनाखाली स्मारकाचे काम मार्गी लागले. रमाबाईंच्या ११८ व्या जयंतीदिनी (७ फेब्रुवारी) बाबासाहेबांच्या तिन्ही नातवांच्या उपस्थितीत स्मारकाचे उद‌्घाटन झाले.

बाबासाहेब लिहितात...
बाबासाहेबांनी ‘पाकिस्तान आणि भारताचे विभाजन’ या ग्रंथाच्या अर्पणपत्रिकेत सहचारिणीबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. ‘जिच्या अंतरंगाचा चांगुलपणा, जिचा उमदा स्वभाव, जिची सुखद सहानुभूती, आणि काळजीच्या दिवसातही जिने मला अविरत साथ दिली त्या रमाच्या स्मृतीस गुणग्राहकतेची खूण म्हणून ही कलाकृती मी अर्पण करतो. रमाबाईंच्या व्रतस्थ जीवनाची नोंद इतिहासात ठळकपणे राहील.’