मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १७ रोजी होणा-याद्वैवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजत असून, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे सत्ताधारी बाळ महाडदळकर गटाचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांना अाव्हान देऊ शकतात. अाठवले सिद्धार्थ कॉलेजचे प्रतिनिधित्व करत अाहेत.
गेल्या वेळी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारे डी. वाय. पाटील यांचे पुत्र विजय यांचा आपल्या क्रिकेट फर्स्ट पॅनलतर्फे त्यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवण्याचा विचार आहे. त्यांचे अध्यक्षपदाचे उमेदवार शिवसेनेचे अनिल देसाई असू शकतात. खासदार राहुल शेवाळे व आमदार प्रताप सरनाईक यांना क्रिकेट फर्स्टच्या झेंड्याखाली मैदानात उतरवण्याचा शिवसेनेचा विचार आहे. माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांनी उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्या गटाचे दुसरे उमेदवार भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष व आमदार आशिष शेलार हे उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, स्वत: आशिष शेलार या राजकीय रंग येत चाललेल्या लढतीत उभे राहण्यास फारसे उत्सुक नाहीत, असेही कळते.