आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधान मंदिर उभारण्याची रामदास आठवलेंची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने रिपाइं अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी काढलेल्या देशव्यापी भारत भीम यात्रेचा रविवारी महाराष्ट्रदिनी महू या बाबासाहेबांच्या जन्मगावी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत समारोप झाला. महू येथे संविधान मंदिर उभारावे, अशी मागणी या वेळी आठवले यांनी केली.

२६ जानेवारी २०१६ रोजी कन्याकुमारी येथून भारत भीम यात्रेला सुरुवात झाली होती. २८ राज्यांत िफरलेल्या या यात्रेने गेल्या चार महिन्यांत ३१ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. ‘जाती तोडो, समाज जोडो’ असा यात्रेचा मुख्य संदेश होता. पूर्ण यात्रा काळात समता रथावर खासदार रामदास आठवले उपस्थित होते.

१ मे रोजी भीमजन्मभूमी (महू, मध्य प्रदेश) येथे यात्रेचा समारोप झाला. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत आणि राष्ट्रसंत भय्यू महाराज यांची समारोप कार्यक्रमाला उपस्थिती होती. महू येथील बाबासाहेबांचे स्मारक काँग्रेस सरकारने लटकवत ठेवले होते, केंद्रात अटलबिहारी यांचे सरकार आल्यानंतर स्मारकाचे काम गतीने झाले. मध्य प्रदेशातील भाजपच्या चौहान सरकारने स्मारकासाठी पुरेसा निधी दिल्याची आठवण गहलोत यांनी सांगितली.

महू येथे संविधान मंदिर उभारण्यात यावे तसेच १०८ फूट उंचीचा बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी या वेळी आठवले यांनी केली. संविधान मंदिरासाठी तीन एकर जागा िमळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी िदले. शाेषितांचे लढे अधिक बळकट करण्यासाठी बहुजनवादाचा अवलंब करण्याची गरज आहे, असे मत भय्यूजी महाराज यांनी व्यक्त केले.

भारत भीम यात्रेच्या ३१ हजार कि.मी. प्रवासात आठवले यांच्या गाडीचे चालक दिनकर चोरमारे यांचा तसेच कोल्हापूरहून सायकलने महूपर्यंत आलेल्या राजेंद्र पाटील यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने हजर होते.
आंबेडकरांवर १२५ रुपयांचे नाणे येणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर सरकार लवकरच १२५ रुपयांचे नाणे काढणार आहे. त्याला अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. लोक ही नाणी घरामध्ये संग्रही ठेवू शकतील, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी समारोपप्रसंगी दिली. केंद्र सरकारने आंबेडकरांसंदर्भात लागू केलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी भाषणात दिली.

आमच्या जिवावर आलात
महाराष्ट्रात, केंद्रात भाजपची सत्ता येण्यात दलित मतांचा मोठा वाटा आहे. तुम्ही आमच्या जिवावर सत्तेत आहात, याची आठवण नरेंद्र मोदी, फडणवीस यांनी ठेवावी. अन्यथा पुढच्या वेळी दलित जनता तुम्हाला घरी बसवेल, असा इशारा आठवले यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...