आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प आमचेच, त्यांना भेटणार : आठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘रिपब्लिकन पक्षाचे’ डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यामुळे आपणाला आनंद झाला असून आपण अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये जाऊन लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प जसे अमेरिकेचे राष्ट्रपती बनले त्याचप्रमाणेच एक दिवस रिपाइंचाही भारतात राष्ट्रपती म्हणून निवडून येईल. रिपब्लिकन पार्टीचा उमेदवार व्हाइट हाऊसमध्ये गेल्यामुळे मी ट्रम्प यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या भेटीसाठी मी अमेरिकेला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...