आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप शिवसेनेने मुंबई एकत्र यावे, आठवलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, उद्धव ठाकरेंनाही भेटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महापालिकेतील सरकार स्थापण्याचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेना आणि भाजप ला एकत्र आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. आज आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबईत शिवसेना भाजपने एकत्र सरकार स्थापन करावे तसेच  दोन्ही पक्षांनी अडीच वर्षे महापौरपद विभागून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेकडून अद्याप युतीचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवलेंना दिले. याच मुद्द्यावर लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
 
मुंबईत सध्या त्रिशंकू अवस्था आहे. मुंबईकरांचा कौल हा भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांना मिळाला आहे. त्या जनमताचा आदर राखून दोन्ही पक्षांनी एकत्र यावे. मुंबईत काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता नाही आणि शिवसेनेनेही त्यांचा पाठिंबा घेऊ नये असे आवाहन आठवले यांनी केले आहे .

भाजप शिवसेना एकत्र न आल्यास मुंबईत सरकार स्थापन करणे अवघड होईल कदाचित त्यामुळे मुंबईत पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ येऊ शकते. मुंबईकरांवर पुन्हा निवडणुकांचा त्रास लादू नका असे आवाहन नाम आठवलेंनी फडणवीस यांना केले. मुंबईत भाजपला मिळालेल्या विजयात रिपाइंचा मोठा वाटा आहे. शिवसेना भाजपची एकत्र सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपच्या कोट्यातून रिपाइंला सत्तेत वाटा मिळेल असेही ते म्हणाले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...