आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athawale News In Marathi, RPI, Divya Marathi

शिवसेना-भाजपने अति आत्मविश्वासात राहु नये, रामदास आठवले यांचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे शिवसेना-भाजपने अति आत्मविश्वासात राहू नये, असा सल्ला महायुतीचा घटक पक्ष व रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी दिला.
रिपाइंतर्फे मुंबईत एका मेळाव्याचे आयोजन केले होते या वेळी आठवले बोलत होते.
आठवले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी अति आत्मविश्वासात राहू नये. याचा फटका त्यांना बसू शकतो. सध्या राज्यात सत्ताधा-यांविरोधात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आघाडी सरकारला खाली खेचण्यासाठी महायुतीला प्रचंड मेहनत करावी लागेल. राज्यातील जनता ही दलितांवरील अत्याचार, भ्रष्टाचार व महागाईमुळे सत्ताधारी सरकारला कंटाळली असल्याचे ते म्हणाले.