आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athawale News In Marathi, RPI, DIvya Marathi

दलित मतांशिवाय निवडून येऊ, या गैरसमजात राहू नये! , आठवलेंचा युतीला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना-भाजप महायुतीमधील घटक पक्षांची नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्यापाठोपाठ रिपाइंच्या रामदास आठवले यांनीही शिवसेना-भाजपला विधानसभेच्या जागांवरून इशारा दिला. दलित मतांशिवाय सत्तेवर येऊ, असा गैरसमज ठेवू नका, असा दमच त्यांनी महायुतीतील आपल्या मोठ्या मित्रपक्षांना दिला आहे.

गेल्या आठवड्यात राजू शेट्टी यांनी स्वािभमानी शेतकरी संघटनेला ५० पेक्षा जास्त जागांची मागणी केली होती. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास वेगळा िवचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावरून िशवसेना नेते रामदास कदम यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दबावाचे राजकारण न करण्याची ताकीद िदली होती, अन्यथा तुम्हाला तुमचे मार्ग मोकळे असल्याचेही सुनावले होते.

आठवलेंनीआपल्या िरपाइं पक्षासाठी िकमान २० जागा मािगतल्या आहेत. २० जागांची मागणी करताना त्यांनी आपले १३ उमेदवारही घोिषत केले होते.आठवले म्हणाले, आता पक्षाची ताकद निश्चितच वाढली आहे. लोकसभेत दलितांनी महायुतीला मतदान केले होते. दलित मतांची संख्या निर्णायक आहे. िवधानसभेत त्याचा माेठा फरक पडू शकतो, हे सेना-भाजपने लक्षात ठेवायला हवे.िरपाइंची खूप काही मागणी नाही. मात्र, तीसुद्धा दुर्लक्षित केली जाणार असेल, तर योग्य ठरणार नाही, असे आठवले म्हणाले.