आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांचा सांभाळ न केल्यास पगारकपातीचा कायदा सर्व राज्यांनी करावा: रामदास आठवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई- सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध आई-वडिलांचा तसेच दिव्यांग भावंडांचा सांभाळ न केल्यास त्यांच्या मासिक पगारातून 10 टक्के रक्कम कपात करण्याचे महत्वपूर्ण विधेयक आसाम विधानसभेत मंजूर झाले. या ऐतिहासिक विधेयकाचे आपण स्वागत करीत असून देशभरातील सर्व राज्यांनी आसाम सरकारच्या या निर्णयाचे अनुकरण करून प्रत्येक राज्याने पालकांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून 10 टक्के  रक्कम कपात करून  पालकांना देण्याबाबतचा कायदा करावा असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

दिव्यांग भावंडं आणि वृद्ध पालकांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारकपाती बाबतचे विधेयक संसदेत ही मंजूर करण्याबाबत आपण प्रयत्न करू असे सांगत आसाम सरकारने याबाबत मंजूर केलेले विधेयक हे ऐतिहासिक आणि दिशादर्शक आहे . या स्तुत्य निर्णयाबद्दल आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे आपण अभिनंदन करीत असल्याचे आठवले यांनी सांगितले.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
 
 
 
बातम्या आणखी आहेत...