आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश आंबेडकर दलितविरोधी- रामदास आठवले; मनसेलाही इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मागासवर्गियांना आता राजकीय आरक्षण नको, जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर शाळेच्या दाखल्यावर फक्त धर्माचा आणि नागरिकत्वाचा उल्लेख करावा, असे क्रांतीकारी (?) विचार मांडणारे भारिप व बहुजन महासंघ पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर 'आरपीआय'चे नेते रामदास आठवले यांनी सडकून टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांची वक्तव्ये ही बेताल असून दलितविरोधी असल्याचे मत आठवले यांनी मांडले आहे. याचबरोबर मनसेलाही त्यांनी फटकारले.
रामदास आठवले यांनी मुंबईत याबाबत बोलताना सांगितले की, प्रकाश आंबडेकर यांची वक्तव्ये दलितविरोधी आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार जर शाळेच्या दाखल्यावरुन जातीचा उल्लेख काढून टाकला तर मागासवर्गिय व ओबीसीच्या मुलांना शैक्षणिक स्तरावर कसा फायदा मिळेल. त्या समाजातील युवक-युवतींना नोक-या कशा मिळतील. यामुळे सामाजिक व आर्थिक विषमता कशी दूर होईल ते मला आंबेडकरांनी सांगावे. भारतीय समाजात आजही आर्थिक व सामाजिक स्थिती वाईट असून, दुर्लक्षित घटकांना सामाजिक न्यायाची गरज आहे. तो दुर्लक्षित वर्ग दलित असल्याने प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य दलितविरोधीच आहे.
मनसेलाही फटकारले- रामदास आठवले यांनी मुंबईत मनसेने फेरीवाल्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच मनसेच्या परप्रांतीय फेरीवाल्याच्या विरोधातील आंदोलनात उडी घेतली. हातावर पोट भरणा-या परप्रांतीय फेरीवाल्यांना दम देऊन दादागिरी करु नये. मनसेला दादागिरी करायचीच असेल तर त्यांनी भारत-पाकिस्तान सीमेवर जावून दादागिरी करावी. फेरीवाल्यांच्या विरोधात मनसे जर मैदानात उतरणार असेल तर आम्हीही फेरीवाल्यांच्या मदतीला जावून रस्त्यावर उतरू, असा इशाराही आठवले यांनी दिला.