आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ramdas Athawale Ultimatum To Today Shiv Sena BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुतीची साथ सोडण्याची रामदास आठवलेंची तयारी, आज देणार अल्टिमेटम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजप-शिवसेना या मित्रपक्षांतील बेबनाव दिवसेंदिवस वाढत असताना आता रिपाइंसारखा छोटा पक्षही जागावाटपाचे घोडे पुढे सरकत नसल्याने महायुतीला सोडचिठ्ठी देण्याच्या निर्णयाप्रत आला आहे. रिपाइं बुधवारी एक पत्रकार परिषद घेऊन आपला अल्टिमेटम देणार आहे.

रामदास आठवले यांच्या रिपाइं गटाने गेली चार वर्षे शिवसेना-भाजपबरोबर घरोबा केलेला आहे. लोकसभेला या पक्षाच्या वाट्यास एक जागा (सातारा) आली होती. विधानसभेला मात्र आठवले यांना किमान १५ जागा हव्या आहेत. पण, महायुतीचे नेते तीन, चार पेक्षा अधिक देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आठवले सध्या नाराज आहेत. त्यांनी आपले गाऱ्हाणे दिल्ली दरबारी मांडले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेटही घेतली. मात्र रिपाइंची मागणी कोणी गांिभर्याने घेण्यास तयार नाही. त्यामुळे दबावतंत्राचा अवलंब आठवले यांनी करण्याचे ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून रिपाइंची बुधवारी मुंबईत विशेष पत्रकार परिषद होत आहे. त्यामध्ये महायुतीला अल्टीमेटम दिला जाणार आहे.

परंतु, गमतीचा भाग म्हणजे या पत्रकार परिषदेत आठवले यांच्या ऐवजी अर्जून डांगळे संबोधणार आहेत.

बारा जागा हव्यात
रिपाइं विधानसभेला १२ जागांच्या खाली एकही कमी जागा घेणार नाही, असे स्पष्ट करत भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या उमेदवारांची नावे महिनाभरापूर्वी दिल्याचे आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
खोब्रागडे "रिपाइं'त
निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी मंगळवारी रिपाइंमध्ये प्रवेश केला. खोब्रागडे मुबईतील धारावी मतदारसंघातून इच्छुक आहेत. १९८४च्या तुकडीचे आयएएस असलेल्या खोब्रागडे यांनी आदिवासी विभाग, अन्न औषध विभागाचे सचिव म्हणून काम पाहिलेले आहे. "आदर्श' प्रकरणातही त्यांचे नाव आहे.
छायाचित्र - रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले उत्तम खोब्रागडे.