आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुतीत राज ठाकरे नकोच; रामदास आठवले यांचे घूमजाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला स्थान नको, अशी भूमिका मांडून रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी कोलांटउडी मारली. 26 मे रोजी त्यांनी ‘राज ठाकरे यांनी महायुतीत यावे’ असे आवाहन केले होते.

पत्रपरिषदेत आठवले म्हणाले की, महायुतीत मनसे नको अशी माझी प्रथमपासून भूमिका होती. परंतु केवळ ‘रिपाइं’च्या विरोधामुळे महायुतीत अडचणी नकोत म्हणून एक पाऊल मागे घेतले होते. भाजप नेते ऊठसूट राज यांना भेटत असल्याबद्दल आठवले यांनी नाराजी प्रकट केली. ‘कुणाला कुणी टाळी द्यायची ते त्याचे त्यांनी ठरवावे, आपण या प्रश्नावर यापुढे काहीही बोलणार नाही,’ असे सांगून ठाकरे बंधूंच्या समेटाबाबत आठवले यांनी कानाला खडा लावल्याचे सांगितले.