आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवले दलित-मराठा ऐक्य परिषद घेणार, शिर्डीत १३ ऑक्टोबर रोजी आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोपर्डी घटना तसेच अॅट्राॅसिटीबाबत मराठा समाजात असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर रिपाइंतर्फे १३ ऑक्टोबर रोजी शिर्डी (जिल्हा- अहमदनगर) येथे दलित- मराठा ऐक्य परिषद आयोजित केल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
मराठा समाजामध्ये आरक्षण आणि शेतीच्या हक्कांसाठी जागृती निर्माण होत आहे. त्यातून लाखोंचे क्रांती मोर्चे निघत आहेत, या मोर्च्यांचे ‘रिपाइं’ने स्वागत करण्याचा िनर्णय घेतला आहे. राज्यात दलित-मराठा यांच्यात बंधुभाव राहावा तसेच दोन्ही समाजांत सलोखा वाढीस लागावा यासाठी ही ऐक्य परिषद घेण्यात येत आहे. या परिषदेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठीचा ठराव संमत करण्यात येणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.
या दलित-मराठा ऐक्य परिषदेस विविध पक्षांतील मराठा नेत्यांना आमंत्रित केले आहे. यापूर्वी ऑक्टोबरला अशी ऐक्य परिषद होणार होती, आता त्यात बदल करून ती १३ ऑक्टोबर रोजी केली आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...