आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athwale\'s Movemnet For The Indu Mill Inaugaration Failed

रामदास आठवले यांचे इंदू मिलमध्ये भूमिपूजन करण्‍याचे आंदोलन फसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बाबासाहेबांच्या स्मारकाची 5 डिसेंबरपूर्वी वीट न रचल्यास महापरिनिर्वाणदिनी भीमसैनिक इंदू मिलमध्ये घुसून भूमिपूजन करतील, अशी धमकी देत रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी राळ उडवून दिली होती. परंतु प्रचंड पोलिस बंदोबस्तासमोर आठवले यांनी नमते घेत शुक्रवारी मिल कंपाउंडशेजारी प्रतीकात्मक पूजन करत आंदोलन उरकले.इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या श्रेयासाठी अनेक जण धडपडत आहेत. त्यात रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आणि ‘रिपाइं’चे रामदास आठवले अग्रभागी आहेत. 5 डिसेंबरपूर्वी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात यावे, नाहीतर भीमसैनिक 6 डिसेंबरला भूमिपूजन करतील, असा इशारा आठवले यांनी दिला होता.हा इशारा शासनाने गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे आठवले यांची चांगलीच पंचाईत झाली. शंभरएक कार्यकर्त्यांसह आठवलेंनी प्रतीकात्मक भूमिपूजन केले.
‘स्मारकात राजकारण आणू नका’
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्‍ट्रीय स्मारक उभारण्यास आघाडी शासन कटिबद्ध असून केवळ श्रेय मिळवण्यासाठी आंदोलने करून स्मारक उभारण्यात अडथळे निर्माण करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रिपाइं आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसला शुक्रवारी फटकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 57 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. ते म्हणाले, आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी केंद्रातील यूपीए सरकार आणि राज्यातील आघाडी शासन कटिबद्ध असून लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विधेयक पारित करण्यात येणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.