आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजितदादा दिवसा भाजपवर तोंडसुख घेतात अन् रात्री \'वर्षा\'वर जाऊन मुख्यमंत्र्याना भेटतात- कदम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. कर्जमुक्तीची मागणी सतत होत होती. गेल्या अधिवेशनात भाजपविरुद्ध सगळ्या पक्षांनी आक्रमक होत कामकाज बंद पाडले होते. कर्जमुक्ती करणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी उद्धव ठाकरे यांना दिले होते. आम्ही दिल्लीलाही गेलो होतो. नंतर शेतकऱ्यांचा संप झाला, कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यावर उद्धव ठाकरे यांनी अभिनंदनही केले. 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. कर्जाचे हफ्ते द्यायला पैसे नसले की बँक घराबाहेर नोटीस लावते, घराबाहेर ढोल वाजवते. मग आता कर्जमाफी झाली पाहिजे, यादी मिळावी यासाठी आम्ही आज राज्यभर बँकांच्या बाहेर ढोल वाजवले.

8 दिवसांत किती जणांना कर्ज माफी दिली, मदत दिली, वन टाइम सेटलमेंट याची यादी बँकाकडून मिळाली पाहिजे. मुख्यमंत्री म्हणत असलेली आकडेवारी आणि बँकांची यादीत तफावत आहे का? ते पाहणार मुख्यमंत्र्यावर अविश्वास नाही पण ही 89 लाख शेतकऱ्यांची यादी जुळते की नाही, हे यातून दिसणार आहे. सरकारने 8 दिवसांत यादी दिली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे.

अजितदादा दिवसा भाजपवर तोंडसुख घेतात अन् रात्री 'वर्षा'वर जाऊन मुख्यमंत्र्याना भेटतात
आर.आर.पाटील उपमुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांना अजित पवारांच्या विरोधात कडक कारवाई करा, असे पत्र दिले होते. सत्ता पालट झाल्यावर सगळ्यात खाली दबलेले ते पत्र सचिवांनी वरती ठेवले, मुख्यमंत्री फडणवीसांनी ते पाहिले आणि 'बघतो' म्हणाले. ही माहिती अजित पवारांना कळाल्यावर त्यांनी तटकरेंना सोबत घेत फडणवीसांची गाठ घेतली. प्रश्न विचारला काय फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर मैत्री विसरलात का? यावर मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्याच माणसाचे प्रताप आहे. असं म्हणत आर.आर.पाटील यांनी केलेल्या तक्रारीची कॉपी दाखवली. कॉपी पाहाताच अजित पवार संतापले पण उपयोग नव्हता. आर.आर.हे हयात नाही. या प्रकरणी गृहमंत्रालयाने रेकॉर्डवर घेतले होते. काहीही करून हे प्रकरण मिटवा, असे सांगण्यासाठी अजित पवार अंधारात 'वर्षा'वर जातात, अशा शब्दात रामदास कदम यांनी अजित पवार यांचाही समाचार घेतला.
बातम्या आणखी आहेत...