आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात राणेसारखा लाचार माणूस नाही, सेनेसाठी राणे हा विषय संपला- कदम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - राज्‍याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नारायण राणे यांच्‍यावर जोरदार टीका केली आहे. नारायण राणेंसारखा लाचार माणूस जगात नाही. असे उद्गार त्‍यांनी राणेंविषयी काढले. कदम हे ठाण्यातील नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी आले असता ते बोलत होते.
नारायण राणे हा विषय शिवसेनेसाठी संपला असल्याचे देखील यावेळी कदम यांनी सांगितले. राज्यावरील काळे सावट दूर झाले असून युती सरकार ताकदीने उभे राहून जनतेला न्याय देईल असा विश्‍वासही कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्‍यक्‍त केला आहे. कदम यांच्‍या या वक्‍तव्‍यावर आता नारायण राणेंची काय प्रतिक्रीया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.