आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीबाबाच मुख्यमंत्रीपदी राहोत म्हणजे महायुती सत्तेवर येईल- आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुढील वर्षी राज्यात होणा-या विधानसभा निवडणूकापर्यंत मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाणच राहायला हवेत. तसेच काँग्रेसने त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूका लढविल्यास महायुती काँग्रेस आघाडीचा पराभव करून सहज सत्तेवर येईल, असे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या तीन वर्षांच्या कारकीर्दीवर भाष्य करताना आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निष्क्रिय नेतृत्व असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनाच कायम ठेवले पाहिजे. कारण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे निष्कलंक व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच त्यांची तीन वर्षांची कारकीर्द कोरी पाटी राहिली आहे, असा उपरोधिक टोला हाणला.
ते पुढे म्हणाले, गेल्या तीन वर्षांत चव्हाण निष्क्रिय राहिल्याने मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांचे 1700 कोटी रुपये अद्याप खर्च झालेले नाहीत. दलित आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली. आदिवासी, गोरगरीबांच्या कामांच्या फायली धूळ खात पडल्या आहेत. कामगार, झोपडीवासीयांचे प्रश्न सोडवले नाहीत. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महागाई दिवसेंदिवस भाव खात आहे व ती कमी करण्यासाठी सरकारने काहीही प्रयत्न केले नाहीत.
सामान्य माणूस आणि गोरगरीब जनता कशी उद्ध्वस्त होईल असेच धोरण कॉंग्रेसने राबविलेले असून मुख्यमंत्र्यांनी त्याला अनुसरून काम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला सत्तेवर आणण्यास पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे पुढील वर्षीपर्यंत राज्याचे मुख्यमंत्रीपदी चव्हाणच राहोत अशी आपली इच्छा असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.