आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramesh Dev And Seema Dev 50th Weding Anniversiry

रमेश- सीमा देव यांची पुन्हा लगीनगाठ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुलांना आई-बाबांच्या लग्नात सहभागी होण्याची संधी कधीच मिळत नाही. मात्र याचे वाईट वाटून न घेता देव कुटुंबीयांनी रमेश व सीमा देव यांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचे पुन्हा धुमधडाक्यात लग्न लावून देण्याची शक्कल लढवली आहे.

चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोडपे म्हणून अमिताभ आणि जया यांच्या तोडीस तोड रमेश व सीमा देव यांचे उदाहरण दिले जाते. या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्याने यंदा पन्नाशी गाठली. निवृत्तीच्या आयुष्यात आणखी काहीच नको असे वाटत असतानाच रमेश आणि सीमा देव पुन्हा बोहल्यावर चढणार आहेत. 50 व्या वाढदिवशी आई-बाबांच्या लग्नाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी अजिंक्य, अभिनय, आरती व देव कुटुंबीयांनी त्यांचे पुन्हा लग्न लावण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे यासाठी खास पत्रिका छापण्यात आल्या आहेत.

‘या सुखांनो’ कार्यक्रमही

84 वर्षीय वर आणि 70 वर्षीय वधू यांना पुढील वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी 1 जुलै रोजी हे अनोखे लग्न लागणार आहे. त्याच वेळी ‘या सुखांनो या’ या कार्यक्रमात रमेश व सीमा देव यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांचा उपस्थितांना आस्वाद घेता येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रथमच असा सोहळा साजरा केला जात असल्याने सर्वांमध्ये उत्सुकता आहे.

रमेश-सीमा देव यांच्या लग्नाची पत्रिका बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...