आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास कदमांचे भाऊ शेकापचे उमेदवार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रायगड मतदारसंघातील शेकापचे उमेदवार रमेश कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ आहेत, तर या मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान खासदार अनंत गिते यांना उमेदवारी दिली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत अनंत गिते यांनी मदत न केल्यानेच रामदास कदम यांना पराभव पत्करावा लागला होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे नाराज असलेले रामदास कदम आता गितेंच्या प्रचारापासून दूर असल्याचे सांगितले जाते.
रामदास कदमही गितेंच्या विरोधात जाऊन कदमांना मदत करत असल्याची चर्चा आहे. कदमांनी मात्र त्याचे खंडण केले आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर कोणतीही प्रचारबंदी घातलेली नसून याबाबत अनंत गितेंनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. संपूर्ण राज्यात मी शिवसेनेचा प्रचार करणार आहे. मी सच्चा शिवसैनिक असून रायगड मतदारसंघातही शिवसेनेचे काम करणार आहे,’ असे रामदास कदम यांनी सांगितले.