आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या तुलनेत मामुटी ज्युनियर अार्टिस्ट' , रामगोपल वर्मा यांचे वादग्रस्त वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - खळबळजनक वक्तव्य करण्यास प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शक रामगाेपाल वर्मा यांनी पुन्हा एकदा दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते मामुटी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करत त्यांना ज्युनियर आर्टिस्ट संबोधले आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘अाे कढाल कनमानी’ हा नवा चित्रपट पाहिल्यानंतर रामगोपाल वर्मा यांनी हे वक्तव्य केले आहे. या चित्रपटात मामुटी यांचा मुलगा दिलकार सलमान याची प्रमुख भूमिका अाहे. दिलकारचा अभिनय पाहिल्यानंतर त्याची स्तुती करायच्या नादात रामू यांनी तब्बल तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या मामुटी यांना मुलाच्या तुलनेत ते ज्युनियर अार्टिस्ट अाहेत, असे संबाेधले. त्यावर केवळ दिलकारनेच नाही तर दक्षिणेतील मामुटीच्या चाहत्यांनी तसेच बाॅलीवूडमधील काही कलाकारांनीही तीव्र अाक्षेप घेतला अाहे.
दिलकारने ‘दहा वेळा जरी जन्म घेतला तरी मी माझ्या वडिलांसारखा अभिनय करू शकणार नाही’ असे रामू यांच्या विधानास ट्विटरवरच उत्तर दिले अाहे.

"सरकार-३'च्या तयारीत

रामगाेपाल वर्मा सध्या अापल्या ‘सरकार ३’ या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहेत. गेल्या काही वर्षांत रामू यांच्या चित्रपटांनी बाॅक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे आता पुन्हा ते महानायक अमिताभ व अभिषेक बच्चन यांना घेऊन "सरकार - ३' ची निर्मिती करत आहेत. किमान त्यांना हा चित्रपट तरी तारेल का? याची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली आहे.

मामुटींचा प्रवास

मामुटी यांनी अाजवर अनेक दक्षिणेतील चित्रपटांमधून सर्वाेत्तम अभिनय केला अाहे. तसेच डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘डाॅ. बाबासाहेब अांबेडकर’ या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील चित्रपटातही मामुटी यांनी डाॅ. अांबेडकरांची भूमिका साकारली हाेती. मामुटी या चतु:रस्र अभिनेत्याबद्दल रामगोपाल वर्मा यांनी असे वादग्रस्त विधान केले असले तरी त्याला मामुटी यांनी काेणतेही उत्तर दिलेले नाही वा अाक्षेप नाेंदवलेला नाही.
बातम्या आणखी आहेत...