आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramvilas Paswan Against Prakash Ambedkar Stetment

पासवान आंबेडकरांच्या विरोधात; राजकीय आरक्षण रद्द करणे घटनाविरोधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रकाश आंबेडकर यांनी शाळेच्या दाखल्यातून जात काढून टाकावी असे वक्तव्य नुकतेच केले. त्यांच्या वक्तव्याचा लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी शनिवारी विरोध केला.
राजकीय आरक्षण रद्द करणे ही घटनाविरोधी मागणी असून आरक्षणाचा आधार जाती व्यवस्था आहे. त्यामुळे आरक्षण नव्हे तर जातीव्यवस्था रद्द करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच या वेळी पासवान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्ली येथील निवास्थान आणि चैत्यभूमी यांना राजघाटाचा दर्जा द्यावा, अशीही मागणी केली. मुंबई प्रेस क्लब तर्फे आयोजित कार्यक्रमात पासवान यांनी पत्रकारांशी बातचित केली.

देशाच्या राजकारणाविषयी बोलताना पासवान यांनी तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता नाकारली. देशाच युपीए आणि एनडीए या दोनच आघाड्या असून तिसरी आघाडी निर्माण होणार नाही. कारण तिसरी आघाडी बनवू शकणारे पक्ष त्यांच्या राज्यात मात्र एकमेकांविरोधात आहेत. तामिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयडीएमके, उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि मुलायम सिंग यादव यांचे पक्ष, असे उदाहरण पासवान यांनी या वेळी दिले. आगामी
लोकसभा निवडणूक लालू प्रसाद यादव यांच्या राजदबरोबर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीबाबत पासवान यांनी पाठिंबा दर्शवला. राष्टÑपिता महात्मा गांधीं यांच्या हत्येमागे आरएसएस होते. त्यामुळे मुस्लिम दहशतवादी संघटनांवर बंदी घातल्यास संघावरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पासवान यांनी या वेळी केली.