मुंबई - अभिनेता रणबीर कपूरने मुंबईतील वाहतूक पोलिसांना नुकतेच २ हजार रेनकोटचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. रणबीरच्या या उपक्रमाबाबत ऋषी कपूर यांनी टि्वटरवर माहिती दिली. दरम्यान, रणबीर कपूर या माध्यमातून मुंबईच्या फुटबॉल टीमचा प्रचारही करणार असून तशी जाहिरातही रेनकोटच्या मागे छापण्यात आली आहे. रेनकोट वाटप करण्याची परवानगी दिल्याबद्दल रणबीरने अधिका-यांचे आभारही मानले आहेत. तसेच वाहतूक पोलिसांनीही रणबीरच्या या उपक्रमाबद्दल आभार मानले.