आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुत्रप्रेमापोटी नारायण राणेंनी द्वेषाची विधाने करू नयेत, किरीट सोमय्यांचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘नारायण राणे यांनी पुत्रप्रेमापोटी समाजात विद्वेष पसरवणारी विधाने करू नये. राणे यांच्या दाव्याप्रमाणे मी मराठीला विरोध करणारी जनहित याचिका कधीही दाखल केली नव्हती, तरीही त्यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांचे म्हणणे खरे मानून मला पोलिसांच्या ताब्यात द्या. तसेच, त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत द्यावी, म्हणजे मी जनतेची माफी मागेन’, अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राणेंना आव्हान दिले. तसेच, त्यांच्या वक्तव्यांबाबत मुख्यमंत्री अजून गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या विकासाच्या दाव्यांसंदर्भात राणे यांचे पुत्र व स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश यांनी वादग्रस्त ट्विट केले होते. राणे यांनीदेखील अप्रत्यक्षरीत्या आपल्या मुलाची पाठराखण करताना आकडेवारी सादर करून गुजरात महाराष्ट्रापेक्षा मागे असल्याचे सांगितले होते. त्यावेळी मराठीला विरोध करणारी जनहित याचिका सोमय्या यांनी दाखल केल्याचा दावा राणे यांनी केला होता. यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी राणे यांच्या वक्तव्याचे खंडन करत पुत्रप्रेमापोटी समाजात विद्वेष फैलावणारी विधाने त्यांनी करू नयेत, असा सल्ला त्यांना दिला. ज्यांची मातृभाषा मराठी आहे व ज्यांना मोदींबद्दल आदर आहे, त्यांनीही मुंबई सोडून गुजरातला निघायचे का ? मुख्यमंत्री यावर का गप्प आहेत, असा सवालही त्यांनी केला.