आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rane Family Clearification On Black Money & Swiss Account Bank

परदेशात ना बँक खाते, ना काळा पैसा; हा तर बदनाम करण्याचा डाव - नारायण राणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माझे अथवा माझ्या कुटुंबियातील कोणाही व्यक्तीचे परदेशात बॅंक खाते नाही. त्यामुळे काळ्या पैशांबाबत आपल्याला काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. राणेंचे चिरंजीव व माजी खासदार निलेश राणेही यांनीही हा दावा फेटाळून लावला आहे. माझे अथवा माझ्या आईचे परदेशातील एचएसबीसी या बॅंकेत खाते नाही व आम्ही कोठेही पैसा ठेवला नाही. कोणताही पुरावा नसताना आमचे नाव पुढे हाणणे हा काँग्रेसमधील बड्या नेत्यांना संपवण्याचा व बदनाम करण्याचा डाव आहे. केंद्रात आणि राज्यात कोणाचे सरकार आहे हे सर्वांनाच माहित आहे. आमच्या कुटुंबियांची परदेशात किती व कोठे संपत्ती आहे याची माहिती दिली जात नाही मात्र मोघमपणे खाते असल्याचे सांगितले जाते. यामागे राजकारण आहे. त्यामुळेच माझ्या वडिलांसारख्या काँग्रेसमधील ताकदीच्या नेत्यांना बदनाम करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे असा आरोपही निलेश यांनी केला आहे. दरम्यान, स्मिता ठाकरे यांची अथवा ठाकरे कुटुंबियांची काळ्या पैशांवरून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
राणेंच्या पत्नी व मुलाचे स्वीस बॅंकेत खाते, स्मिता ठाकरेंकडेही काळा पैसा- दैनिकाचा दावा
देशात काळ्या पैशांवरून मागील काही वर्षापासून रान पेटलेले असतानाच, भारतीयांचे सुमारे 25 हजार 420 कोटी रूपये स्वीस बॅंकेत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'द इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबतचे आज वृत्त प्रकाशित केले. परदेशातील एचएसबीसी बॅंकेत काळा पैसा असलेल्या व्यक्तींची संख्या (खाते) 1195 असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. यात राज्यातील अनेक बड्या उद्योगपतींसह काही राजकीय नेत्यांचीही नावे पुढे आली आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे व मुलगा निलेश राणे यांचे या बॅंकेत खाते असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या सून स्मिता ठाकरे यांनीही या बॅंकेत काळा पैसा ठेवल्याचे उघड केले आहे. दरम्यान, स्मिता ठाकरे यांनी किंवा ठाकरे कुटुंबियांनी काळ्या पैशांवरून कोणतेही अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे थोरले चिरंजीव जयदेव ठाकरे यांच्या पत्नी असलेल्या स्मिता ठाकरे यांचे परदेशातील बॅंकेत 64 लाख रूपये असल्याचे आजच्या वृत्तात म्हटले आहे. विशेष म्हणजे आजच स्मिता ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरेंचा विवाह असल्याने त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
पुढे वाचा, राहुल ठाकरेंचा आजच विवाह...