आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rane Lost In Vandre By Poll By 19 Thousand Votes

पराभवाचेच नज\'राणे\'!; \'इस बार हमे माफ करो\', मतदारांनी राणेंना दिले होते संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बहुचर्चित वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा १९ हजार ०८ मतांनी दणदणीत पराभव केला. कुडाळमधील पराभवानंतर थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या `मातोश्री'च्या अंगणात राणेंनी शिवसेनेला आव्हान दिले होते. यामुळे शिवसैनिक पेटून उठले होते. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून मैदानात उतरलेल्या काँग्रेस व एमआयएम या दाेघांपेक्षाही जास्त मते शिवसेनेच्या पारड्यात पडली. तसे संकेतही मतदारांनी प्रचारादरम्यानच राणेंना दिले होते.

बाळा सावंत यांचे निधन झाल्यामुळे वांद्रे पूर्वमध्ये ११ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीने राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या पोटनिवडणुकीत फक्त ३९ टक्केच मतदान झाल्याने विजयाचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता होती. शिवसेना आणि राणेंनीही विजयाचा दावा केला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम राखत तृप्ती सावंत यांनी बाजी मारली. त्यांना एकूण ५२,७११ मते मिळाली, तर राणेंना ३३,७०३ मते मिळाली. १५०५० मते मिळवून एमआयएमचे रेहबर खान तिस-या क्रमांकावर राहिले.

मागच्या वेळी रेहबर खान २३ हजार मते घेत तिस-या क्रमांकावर तर काँग्रेसला चौथ्या क्रमांकावर होती. या वेळी राणेंमुळे काँग्रेस दुसया क्रमांकावर आली.
पराभवाची कारणे...
- मराठी मतदार व शासकीय वसाहतीत मत विभागणी होऊन आपल्याला ही मते मिळतीलच, हा राणेंचा अंदाज मात्र साफ चुकला.
- बेहरामपाडा, भारतनगर, नौपाडा या मुस्लिमबहुल भागातील मते काँग्रेसला पडतील, हा राणेंचा अंदाज पूर्णपणे फोल ठरला.
- पहिल्या फेरीपासूनच ५ हजारांहून जास्त मतांची आघाडी घेत शिवसेनेने नारायण राणेंना शेवटपर्यंत जवळही येऊ दिले नाही.
- मराठी मतांबरोबरच उत्तर भारतीय अाणि दलित मतदारांनीही शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर मते दिली. त्यामुळे राणे हरले.
आश्वासने पूर्ण करू
उद्धवसाहेबांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाला. सावंत साहेबांनी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू. - तृप्ती सावंत
सुमनताई पाटलांना आबांहून दुप्पट मते
सांगली | तासगाव- कवठे महांकाळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या पत्नी व राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांनी तब्बल १ लाख १२ हजार ९६३ एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत सर्व प्रतिस्पर्ध्यांची अनामत जप्त केली. विशेष म्हणजे, अापल्या राजकीय कारकीर्दीत अाबांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा सुमनताईंचे मताधिक्य दुपटीच्या जवळपास आहे. आर.आर.पाटील यांनी २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा ६५,१७३ मतांनी, तर २०१४ मध्ये भाजपचे अजितराव घोरपडे यांचा २२ हजार ४१० मतांनी पराभव केला होता.
पुढील स्लाइडवर वाचा, राणेंना काय म्हणाले मतदार आणि राणेंची प्रतिक्रिया...