आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rane Supporter Ravindra Phatak Joins Shiv Sena With Seven Congress Corporaters

नारायण राणेंचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक सात नगरसेवकांसह शिवसेनेत दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नारायण राणेंसह काँग्रसेलाही मोठा धक्का दिला आहे. नाराणय राणेंचे कट्टर समर्थक समजले जाणारे रविंद्र फाटक यांनी काँग्रेसच्या सात नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यात नारायण राणे स्वतंत्र पक्ष काढणार या बरोबरच ते पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनाही ऊत आला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा छळ करणा-यांना शिवसेनेत जागा नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याचबरोबर नारायण राणेंनीही उद्धव यांच्यावर हल्ला चढवला. या सर्व प्रकारामुळे राणे विरुद्ध शिवसेना असा वाद पुन्हा एकदा सुरू झाला. पण शनिवारी रविंद्र फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या वादात शिवसेनेने नारायण राणेंना धक्का दिल्याची चर्चा सुरू आहे. रविंद्र फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे त्यांच्याबरोबर मातोश्रीवर आले होते.
दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर फाटक यांच्यासह सात नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने राणेंबरोबरच काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. त्याचे कारण म्हणजे आधीच काँग्रेस नारायण राणे यांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्याआधीच राणे समर्थकांनी पक्ष सोडण्यास सुरुवात केल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता वाढणार आहेत.