आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राणेही निर्णय प्रक्रियेत होतेच : अशोक चव्हाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही. कार्यकर्ते तयार आहेत, पण नेते पाठीशी नाहीत म्हणून काँग्रेसला उभारी नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. यावर राणेंचे मत हे वैयक्तिक असून ते निर्णय प्रक्रियेत होते. निकालामागे नेमकी काय कारणे होतील ते समोर येईल, असे प्रत्युत्तर चव्हाण यांनी दिले.

राणेंनी नक्की कुणाबाबत असे झाले ते स्पष्ट करावे. त्यांचा रोख कुणाकडे हे त्यांनी उघड सांगावे. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकमेकांवर जाहीरपणे आरोप करणे योग्य नाही. जाहीर बोलण्यापेक्षा विषय सोडवा, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली. आता पहिल्या टप्प्याचे निकाल आले असून आणखी तीन निवडणुका बाकी आहेत. सर्व टप्पे पार पडल्यानंतर शांतपणे बसून चर्चा करता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी न करण्याचा काँग्रेसला फटका बसला, असे बोलले जात असले तरी आता त्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही. लवकरच दोन्ही पक्षांचे नेते बैठक घेऊन यावर बोलतील आणि पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांविषयी रणनीती आखता येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...