आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादच्या अंकितचे शतक, कर्णधार स्वप्निलचे दीड शतक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध सुरू असलेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या दिवसअखेर गुरुवारी ९० षटकांत २ बाद २९० अशी भक्कम धावसंख्या उभारली. कर्णधार स्वप्निल गुगळे नाबाद १५२ आणि मधल्या फळीतील फलंदाज औरंगाबादच्या अंकित बावणेने नाबाद १२० दमदार शतके केली हे पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. अंकितने शैलीदार फलंदाजी करून सर्वांची मने जिंकली.
नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राची सुरुवात सुमार झाली. सलामीवीर हर्षद खडीवाले (१०)पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून देण्यास अपयशी ठरला. त्यानंतर आलेला चिराग खुराणा (४) दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. महाराष्ट्र संघ २ बाद ४१ धावा असा संकटात सापडला असताना स्वप्निल गुगळे आणि अंकित बावणे यांनी तिसऱ्या विकेटसाठी २४९ धावांची अभेद्य भागीदारी करून डाव सावरला. कर्णधार स्वप्निल गुगळेने शानदार दीड शतक ठोकले. स्वप्निलने २६१ चेंडूंचा सामना करताना १९ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद १५२ धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या युवा फलंदाज अंकित बावणेने शतक झळकावत आपला फॉर्म पुन्हा एकदा सिद्ध केला. ताे २६० चेंडूंत ९ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद १२० धावांवर खेळत आहे. अंकितने उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, पुलचे फटके मारुन मैदान गाजवले. त्याने १ षटकारही मारला.

स्वप्निल-अंकितची द्विशतकी भागीदारी
पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या स्वप्निल गुगळे आणि अंकित बावणे या अनुभवी जोडीने चौथ्या विकेटसाठी शानदार नाबाद द्विशतकी भागीदारी रचली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ४९१ चेंडूंचा सामना करताना २४९ धावांची भागीदारी केली.
विजयात योगदान द्यायचेय
^मी खेळपट्टीवर आलो तेव्हा आमच्या दोन विकेट पडल्या होत्या. त्यानंतर स्वप्निल आणि मी खेळपट्टीवर टिकून राहण्याच्या निर्धार केला, खेळत गेलो. खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असल्याने चेंडू बॅटवर चांगले येत हाेते, त्यामुळे फटकेबाजी करता आली. पहिल्या दिवशी आम्ही दोघांनी नाबाद शतके झळकावली. दुसऱ्या दिवशी आम्हाला संघाला पाचशे पार धावसंख्या करायची आहे. संघाच्या विजयात योगदान देण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील.
- अंकित बावणे, रणजीपटू
बातम्या आणखी आहेत...