आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raosaheb Danve Could Be Next Maharashtra BJP President

भाजप प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय ग्राहक राज्यमंत्री रावसाहेब दानवे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय ग्राहक राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. भाजपच्या राज्य कोअर कमिटीनेही दानवेंच्या नावाला आक्षेप नसल्याचे पक्षाध्यक्ष अमित शहांकडे स्पष्ट केल्याने त्यांच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकताच उरली आहे.

फडणवीस यांच्यानंतर पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण, या प्रश्नावरील खल आता संपला असून राज्यातले प्रमुख नेते आणि पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीने दानवेंचे नाव निश्चित केले आहे. याबाबत शहांना विचारले असता ते म्हणाले की, "प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीचा निर्णय लवकरच घेतला जाईल.' तरुण नेत्यालाच प्रदेशाध्यक्षपद द्यावे असा मतप्रवाह होता. त्यामुळे सुभाष देशमुख, संजय कुटे आणि संभाजी निलंगेकर पाटील यांची नावे चर्चेत होती. मात्र दानवेंसारख्या जुन्या जाणत्या नेत्याला हे पद देण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे.

समतोल साधण्याचा प्रयत्न
राज्याच्या मंत्रिमंडळात विदर्भाला झुकते माप मिळाल्याने किमान प्रदेशाध्यक्षपदी मराठवाड्याला संधी देत राज्यातल्या नेतृत्वात समतोल साधण्याचा प्रयत्न केंद्रीय नेतृत्वाने केला आहे.