आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rape Accused Sold The Mobile Which Had Video Clip Of Rape

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई गँगरेपः पीडितेसोबत सहका-याचीही हत्‍या करण्‍याचा होता आरोपींचा विचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महिला वृत्तछायाचित्रकार तरुणीवर झालेल्‍या बलात्‍कार प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्‍यात आली आहे. परंतु, आता दुसरीच समस्‍या निर्माण झाली आहे. आरोपींनी छायाचित्रण केलेला मोबाईल जप्‍त करण्‍यात पोलिसांना अपयश आले आहे. हा मोबाईल आरोपीने दिल्‍लीत विकल्‍याची माहिती आहे. घटनेच्‍या वेळेस काढलेले फोटो आणि व्हिडीओ क्लिप्‍स अजुनही त्‍या मोबाईलमध्‍येच आहेत. त्‍यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एका आरोपीला दिल्‍लीतून अटक करण्‍यात आली. त्‍याने पैशांची चणचण भासल्‍यामुळे मोबाईल दिल्‍लीतच विकला. फोटो आणि व्हिडीओ त्‍यातच असल्‍यामुळे वेगळीच समस्‍या निर्माण झाली आहे. फोटो आणि क्लिपचा गैरवापर होण्‍याची भीती असून पीडितेची ओळखही सार्वजनिक होण्‍याचा धोका आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्‍हणजे मोबाईल क्लिप याप्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. त्‍यामुळे कोणत्‍याही परिस्थितीत पोलिसांना तो मोबाईल आणि डाटा हस्‍तगत करणे अतिशय आवश्‍यक आहे. विशेष म्‍हणजे, पीडित तरुणीने हे फोटो आणि व्हिडीओ नष्‍ट करण्‍याची पोलिसांना विनंती केली होती.

आरोपींनी पीडित तरुणी आणि तिच्‍या सहका-याला ठार मारण्‍याचा विचार आरोपींनी केला होता. परंतु, हत्‍या केल्‍यास आपण लवकर पकडले जाऊ, असे सांगून बंगालीने हा प्‍लॅन बदलला. पीडितेची व्हिडीओ क्लिक बनविली आहे. त्‍यामुळे ती पोलिसांकडे जाण्‍याची हिंमत करणार नाही, अशी खात्री वाटल्‍यामुळे दोघांना सोडून देण्‍यात आले.

'भाई, बढीया माल आया है. खातिरदारी करनी है'... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..