मुंबई- मुंबईकरांची लाईफ-लाईन असलेली लोकल रेल्वेमध्ये गुरूवारी रात्री 11 च्या सुमारास महिला डब्यातून प्रवास करणा-या 22 वर्षीय तरूणीवर एका तरूणाने बलात्काराचा प्रयत्न केला होता. त्याला आज (सोमवार) पोलिसांनी अटक करण्यात आली असून, त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती मुंबई विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद विजय झा यांनी दिली.
सीसीटीव्हीत झाला होता कैद
या तरुणाने बलात्काराचा प्रयत्न यशस्वी न झाल्याने त्याने संतप्त होऊन पीडित तरूणीचे कापडे फाडण्याचा प्रयत्न केला. संबंधित तरूणीचे MBA इतके शिक्षण झाले आहे. दरम्यान, मुलीशी झटापट करणारा हा विकृत युवक सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. रेल्वे पोलिसांनी हे फुटेज सर्व पोलिस ठाण्याला पाठवले. त्या आधारेच त्याला अटक करण्यात आली.
महिला डब्यात एकची प्रवास करीत होती तरूणी
गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास मालाड स्टेशनवरून संबंधित तरूणी चर्चगेटकडे जाणा-या महिला डब्यात चढली. त्यावेळी गाडीत कोणीही नव्हते. पुढे ग्रॅंट रोडवर या डब्यात एक तरूण शिरला. रेल्वे सुरु होताच तरूणाने तरूणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तरूणी घाबरली व त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिला धक्काबुकी केली व तिचे कापडे फाडण्यास सुरुवात केली.
रेल्वेतून उडी मारून फरार झाला होती.
पुढील रेल्वे स्टेशन्स येताच तरूणीने मोठ्याने ओरड्याचा प्रयत्न केला. त्यामळे संबंधित तरूणाने चर्नी रोडवरील स्टेशन्सच्याआधी चालत्या रेल्वेतून उडी फेकली. त्यानंतर तरूणीने मरीन लाईन स्टेशन मास्टरकडे तक्रार दाखल केली. शुक्रवारी सकाळी जेव्हा संबंधित तरूणीला सीसीटीव्ही फुटेज दाखवले तेव्हा आरोपीला ओळखले. आरोपीने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि बरमूडा घातला होता व रेल्वे येण्याआधी तो स्टेशनवर फिरत होता. एमबीए पर्यंत शिक्षण झालेली ही तरूणी मूळची पुण्याची आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा सीसीटीव्ही फुटेजचे फोटोज...