आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • रूवारी रात्री 11 च्या सुमारास महिला डब्यातून प्रवास करणा या 22 वर्षीय तरूणीवर एका तरूणा

मुंबईत लोकल रेल्वेत 22 वर्षीय MBA तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीसीटीव्हीत कैद झालेला आरोपी - Divya Marathi
सीसीटीव्हीत कैद झालेला आरोपी
मुंबई- मुंबईकरांची लाईफ-लाईन असलेली लोकल रेल्वे सेवा अलीकडे धोकादायक ठरू लागली आहे. गुरूवारी रात्री 11 च्या सुमारास महिला डब्यातून प्रवास करणा-या 22 वर्षीय तरूणीवर एका तरूणाने बलात्काराचा प्रयत्न केला. तसेच हा प्रयत्न यशस्वी न झाल्याने संतप्त झालेल्या तरूणाने या तरूणीचे कापडे फाडण्याचा प्रयत्न केला. संबंधित तरूणीचे MBA इतके शिक्षण झाले आहे. दरम्यान, मुलीशी झटापट करणारा हा विकृत युवक सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. रेल्वे पोलिसांनी हे फुटेज सर्व पोलिस ठाण्याला पाठवले असून, त्याला लवकरात लवकर अटक करण्याचे आवाहन केले आहे.
महिला डब्यात एकची प्रवास करीत होती तरूणी-
गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास मालाड स्टेशनवरून संबंधित तरूणी चर्चगेटकडे जाणा-या महिला डब्यात चढली. त्यावेळी गाडीत कोणीही नव्हते. पुढे ग्रॅंट रोडवर या डब्यात एक तरूण शिरला. रेल्वे सुरु होताच तरूणाने तरूणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तरूणी घाबरली व त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिला धक्काबुकी केली व तिचे कापडे फाडण्यास सुरुवात केली.
रेल्वेतून उडी मारून फरार झाला तरूण-
पुढील रेल्वे स्टेशन्स येताच तरूणीने मोठ्याने ओरड्याचा प्रयत्न केला. त्यामळे संबंधित तरूणाने चर्नी रोडवरील स्टेशन्सच्याआधी चालत्या रेल्वेतून उडी फेकली. त्यानंतर तरूणीने मरीन लाईन स्टेशन मास्टरकडे तक्रार दाखल केली. शुक्रवारी सकाळी जेव्हा संबंधित तरूणीला सीसीटीव्ही फुटेज दाखवले तेव्हा आरोपीला ओळखले. आरोपीने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि बरमूडा घातला होता व रेल्वे येण्याआधी तो स्टेशनवर फिरत होता. एमबीए पर्यंत शिक्षण झालेली ही तरूणी मूळची पुण्याची आहे. ती पुण्याला रवाना झाली असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. हा आरोपी व्यसनी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मुंबई लोकल रेल्वे सेवा व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुढे छायाचित्रातून पाहा, सीसीटीव्हीत कैद आरोपी....
बातम्या आणखी आहेत...