आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - दोन महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या एका आरोपीला पोलिसांनी ठाणे येथून अटक केली. प्रेमसिंग सोळंकी असे नराधम आरोपीचे नाव आहे. या कामासाठी त्याला मदत करणार्‍या आरती गुप्ता हिलाही पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित मुलीची काही दिवसांपूर्वी प्रेमसिंग याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने मुलीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर दोन महिने अनेकदा अत्याचार केले. गुरुवारीही प्रेमसिंग हा मुलीवर जबरदस्ती करत होता. या वेळी मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेत थेट पोलिस ठाणे गाठून झालेला प्रकार सांगितला. मुलीच्या तक्रारीनंतर प्रेमसिंग व आरतीला पोलिसांनी अटक केली.