आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेते मधू चव्‍हाण यांच्‍यावर बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कर्नाटकमध्‍ये भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे महाराष्‍ट्रातही एक मोठा धक्‍का बसला आहे. भाजपचे नेते मधू चव्‍हाण यांच्‍यावर बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल झाला आहे. काळा चौकी पोलिस ठाण्‍यात बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल झाला आहे. लग्‍नाचे आमिष दाखवून बलात्‍कार केल्‍याचा आरोप चव्‍हाण यांच्‍यावर करण्‍यात आला होता. त्‍यानंतर काल सायंकाळी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला.

मधू चव्‍हाण यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. सर्व आरोप धादांत खोटे असून न्‍यायालयाकडून न्‍याय मिळेल, असे त्‍यांनी सांगितले.

मधू चव्‍हाण यांच्‍यावर यापूर्वीही शोषणाचे आरोप लागले आहेत. 2008 मध्‍ये त्‍यांची मुंबई भाजप अध्‍यक्षपदी निवड झाली त्‍यावेळी काही महिला कार्यकर्त्‍यांनी त्‍यांच्‍यावर शोषणाचे आरोप केले होते.