आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि वॉचमनमुळे डॉक्टर विवाहितेवरील बलात्कार थोडक्यात टळला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हॅलो... मी पुणे क्राइम ब्रँचच्या सायबर सेलमधून बोलतोय. तुमच्या पतीला जर्मनीच्या फ्रँकफर्ट विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटमध्ये हात असल्याच्या संशयावरून जर्मन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांना सोडवायचे असेल तर ताबडतोब मला वाशीला येऊन भेटा. वाशीला बोलावून विवाहितेवर बलात्कार करण्याचा पद्धतशीर कट स्वतःला पोलीस सांगणार्‍या त्या भामट्याने रचला होता. तसे करण्यात जवळपास तो यशस्वीदेखील झाला होता, पण ऐनवेळी वॉचमन धडकला आणि डॉक्टर विवाहितेची अब्रू वाचली.
ही घटना घडली आहे मुंबईत विलेपार्ले भागात राहणा-या डॉक्टर असलेल्या विवाहित महिलेसोबत. आयुर्वेदिकच्या डॉक्टर असलेल्या रिमा (नाव बदललेले) या आपल्या पती व दोन मुलांसह मुंबईतील विलेपार्ले येथे राहतात. त्यांचे पती एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला आहेत. 6 फेब्रुवारीला रिमाचे पती जर्मनीला रवाना झाले होते. त्याच दिवशी रिमा यांच्या मोबाईलवर फोन आला. पुण्याच्या सायबर क्राइम विभागातून पोलीस अधिकारी बोलतोय अशी ओळख समोरच्याने सांगितली. तुमच्या पतीला फ्रँकफर्टमध्ये सेक्स रॅकेटमध्ये हात असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्यांची सुटका करायची असल्यास तत्काळ वाशीला या असे सांगून रिमा यांना वाशीला बोलावून घेतले. वाशीला आल्यानंतर त्या तोतया पोलिसाने अनामिका यांना रघुलीला मॉलच्या वरच्या गच्चीत नेले परंतु त्यादिवशी रिमा यांचे नशीब बलवत्तर होते. तो तोतया पोलिस रिमा यांची इज्जत लुटण्याच्या प्रयत्नात असतानाच मॉलमधील वॉचमन तेथे धडकला. त्यामुळे त्या बचावल्या. आरोपी फरारी असून विलेपार्ले पोलीस त्या तोतया पोलिसाचा शोध घेत आहेत.
पुढे वाचा, या तोतया पोलिसाने रिमाला कसे लावले गळाला व रिमा कशा फसत गेल्या...