आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालक नसतानाही बस धावली, पिंपळे-गुरवमध्ये केवळ सुदैवाने वाचला अनेकांचा जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बस थांब्यावरुन निघून चौकात आली. - Divya Marathi
बस थांब्यावरुन निघून चौकात आली.

पुणे- पिंपळे-गुरव येथील बस स्थानकावर पीएमपीएमएलच्या  बसमध्ये चालक आणि वाहक नसताना ही बस अचानक सुरू झाली आणि 100 मीटर पुढे जाऊन दुचाकींना आणि गॅरेजला धडकली.

 

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोमवारी रात्री साडे आठ वाजता हा प्रकार घडला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मार्केटयार्डवरून आलेल्या या बसची नोंद करायला चालक आणि वाहक गाडी सुरु ठेवूनच खाली उतरले. त्याचवेळी अचानक ही घटना घडली. दरम्यान, अशा प्रकारच्या बेजबाबदारपणावर कारवाईची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. सुदैवाने या घटनेत अनेकांचा जीव वाचला आहे. 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...