आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत धावत्या लोकलमध्ये बावीस वर्षीय तरुणीवर शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही तरुणी मालाड स्थानकामध्ये चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढली होती. पीडित तरुणी महिलांच्या डब्यात एकटीच असल्याचे हेरून आरोपीने चर्नी रोड स्थानकादरम्यान तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

रात्रीची वेळ असूनही महिला डब्यात सुरक्षारक्षक नव्हता. त्यामुळे आरोपी डब्यात चढला आणि त्याने तरुणीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याने घाबरलेल्या तरुणीने जिवाच्या आकांताने आरडाओरडाही केला. मात्र, धावती ट्रेन आणि डब्यात कोणीही नसल्याने ितचा आवाज पोहोचत नव्हता. चर्नी रोड स्टेशन जवळ येत असल्याचे पाहताच आरोपीने धावत्या ट्रेनमधून उडी मारली.