आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : प्‍लेस्‍कूलमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर व्हॅन स्टाफने केला रेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मालाड परिसरातील एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर व्हॅन अटेंडंट (गाडीमध्ये असणारा सहायक)ने बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा करण्यात येत आहे. आरोपीने त्याचे वय साडेसतरा वर्षे असल्याचे सांगितले असून, पोलिसांनी त्याचे खरे वय शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्टला दुपारी चारच्या सुमारास शाळा संपल्यानंतर घरी जाण्यासाठी ही मुलगी शाळेच्या पार्किंग एरियामध्ये आली होती. त्याठिकाणी आल्यावर तीने टॉयलेटला जायचे असल्याचे स्कूलव्हॅन अटेंडंटला सांगितले. त्यानंतर आरोपीने तिला टॉयलेटला नेण्याऐवजी त्याठिकाणापासून थोडे दूर नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार केला.

घरी आल्यावर या मुलीने जेव्हा आईकडे वेदना होत असल्याची तक्रार केली त्यावेळी तिच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा मुलीच्या गुप्तांगावर जखमा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मुलीला तिच्या आईने विचारल्यानंतर त्या चिमुरडीने संपूर्ण घटना सांगितली. या प्रकरणी लगेचच आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.