आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षारक्षकाकडून कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; सीसीटीव्ही फुटेजमुळे अमानवीय कृत्य उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.
मुंबई- चेंबूरमध्ये एका गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे हे अमानवीय कृत्य उघड झाले.  राम नरेश (41) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीला कुर्ला मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
चेंबूर नाक्याजवळील एका गृहनिर्माण सोसायटीत तो सुरक्षारक्षकाचे काम करायचा. सलग तीन दिवस त्याने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले. राम नरेश कुत्र्याला बाथरुममध्ये घेऊन गेल्यानंतर आतमधून दरवाजा बंद करायचा. पाच ते सात मिनिट तो कुत्र्यासोबत बाथरुममध्ये असायचा. या सोसायटीच्या सचिव अस्मिता देशमुख यांनी मागच्या काही दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी राम नरेश कुत्र्याला बाथरुममध्ये घेऊन गेल्यानंतर आतमधून दरवाजा बंद करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  
 
दिवसा चालवायचा ऑटोरिक्षा 
राम नरेश दिवसा ऑटोरिक्षा चालवायचे काम करायचा आणि रात्री सोसायटीत सुरक्षारक्षकाचे काम करायचा. त्याला खासगी सुरक्षाकंपनीमार्फत नियुक्त करण्यात आले होते. आयपीसीच्या कलम 377 अंतर्गत एफआयआर दाखल झाल्यानंतर चेंबूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वेटर्नरी डॉक्टर्सनी वैद्यकीय अहवालात कुत्र्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हटले आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...