आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचारसत्र सुरूच, चारवर्षीय बालिकेसह तिघींवर मुंबईत बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच अजूनही मुंबापुरीतील महिला सुरक्षित नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. रविवारी रात्री एका चारवर्षीय बालिकेसह अन्य दोन युवतींवर बलात्काराच्या घटना समोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान उभे राहिले आहे.

ओशिवरा येथे एका नराधमाने चारवर्षीय मुलीचे अपहरण करून तिला एका उद्यानात नेले व तिथे अत्याचार केले. तसेच घटनेनंतर पळ काढला. पीडित मुलीने झालेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सलीम हफीज याला अटक केली आहे.

दुसर्‍या घटनेत वर्सोवा येथील पूर्वीच्या प्रियकराच्या मित्राने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार पीडित तरुणीने पोलिसांत दिली आहे. त्यानंतर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तिसर्‍या घटनेत जोगेश्वरी येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.